Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादजुन्या पैठण मधील नागघाटावर पैठणकरणी केली नाग पंचमी साजरी!

जुन्या पैठण मधील नागघाटावर पैठणकरणी केली नाग पंचमी साजरी!

जुन्या पैठण मधील नागघाटावर पैठणकरणी केली नाग पंचमी साजरी!

पैठण/प्रतिनिधी/ दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र जुन्या पैठण मधील शालिवाहन नगरीतील नाग घाटावर श्रावण शुद्ध पंचमी शुभ-परवावर श्रावणी सोमवारी दिनांक 17 रोजी भक्तिमय वातावरणात नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला या सोहळ्यानिमित्ताने नाग घाटावर छोटी यात्रा भरली होती. भल्या पहाटे नागेश्वर नागदेवता दगडी मूर्तीचा अभिषेक सचिन जाधव व कांता वरकड यांच्या हस्ते पुरोहित जितेंद्र कुलकर्णी व योगेश कस्तुरे यांच्या मंत्रउच्चारात संपन्न झाला दिवसभरात अनेकांनी नागेश्वर नागदेवतांचे अभिषेके केली यावेळी सतीश सराफ, सतीश मुळे, दिलीप रावस, पंढरीनाथ फुलझळके, बालप्रसाद साबू, दिलीप रावस, दिनेश पारीख, बबलू रावस,प्रसाद खिस्ती संतोष हिंगे आधी कार्यकर्ते उपस्थित होते श्रावण महिन्यातील सोमवारी नागपंचमी आल्यामुळे भक्तात अति आनंदाचे वातावरण पाहाव्यास मिळाले. नाग घाटावरील प्राचीन घटनेचा तथा ऐतिहासिक घटनेचा इतिहास जतन करण्यात आलेला आहे राज्य सरकारने नागघाटाला राष्ट्रीय स्मारक जाहीर करून नागघाटाचा विकास करावा अशी मागणी नागघाट भक्तमंडळाने केली आहे. रूढी, परंपरा, चालीरीतीप्रमाणे या ही वर्षी भक्तांची नागघाटावर गर्दी उसळली होती पैठणकरांनी घरा घरात भक्ती गीते म्हणून नागाच्या फोटोचा आणि मूर्तीची पूजा केली पैठण तालुक्यातील वाहेगाव, वडवळी,टाकळीअंबड येथेही नागपंचमी थाटामाटात साजरी झाली.
Previous article
Next article
जालन्याच्या महिला पोलीस कर्मचारी पुनम भट्ट यांच्या कर्तव्यनिष्ठेचा भारत सरकारकडून गौरव टेंभुर्णी / राज भाले जालना जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पुनम पुरणचंद्र भट्ट यांना भारत सरकारकडून ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले आहे. या सन्मानामुळे जालना पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू यांनी पत्राद्वारे हा सन्मान जाहीर करून पदक प्रदान केले. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि कार्यतत्परता यांची दखल घेत केंद्र सरकारने हा पुरस्कार दिला आहे. पुनम भट्ट यांनी आपल्या सेवाकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंध व तपास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सेवा बजावण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वरिष्ठांनी सोपविलेल्या तत्पर जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments