Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादखुलताबाद येथे NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांच्या नेतृत्वात...

खुलताबाद येथे NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीसह विविध संघटनांचे आंदोलन

खुलताबाद येथे NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीसह विविध संघटनांचे आंदोलन

खुलताबाद/प्रतिनिधी/  NEET पेपरफुटी प्रकरणाचा निषेध, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी,दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध तसेच मुंबईतील आंदोलकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आज खुलताबाद तहसील कार्यालया समोर सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे.व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजीव घोरपडे,
यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीसह विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व शेकडो नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. आंदोलना नंतर  तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात आंदोलकांनी NEET पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.तसेच विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या शिवाय दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांवर झालेल्या लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,मुंबईतील आंदोलना दरम्यान अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना न्याय मिळावा, तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या घटनात्मक अधिकाराचा सन्मान राखावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, सुरक्षा व उत्तरदायित्व वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी केंद्र शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments