Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादमाजलगाव निर्भीड पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर उपाध्यक्षपदी शेख हमीद तर...

माजलगाव निर्भीड पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर उपाध्यक्षपदी शेख हमीद तर सचिवपदी सय्यद अलीम यांची निवड

माजलगाव निर्भीड पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर
उपाध्यक्षपदी शेख हमीद तर सचिवपदी सय्यद अलीम यांची निवड
माजलगाव/प्रतिनिधी/  माजलगाव येथील येथे निर्भीड पत्रकार संघाच्या माजलगाव तालुका कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र ढाका यांच्या आदेशानुसार तसेच बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारिणीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी तालुका उपाध्यक्षपदी शेख हमीद, तालुका सचिवपदी सय्यद अलीम, सहसचिवपदी विजय कापसे  कोषाध्यक्षपदी सुनील थोरात, संघटकपदी बालासाहेब उफाडे, सल्लागारपदी शेख अखिल, कार्यवाहपदी निलेश गरड तसेच कार्याध्यक्षपदी आकाश लोखंडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून  किसन महाराज पवार, गणेश तैर, तेजस शिंदे, रंजीत आडागळे आणि राम गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पत्रकारांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बैठकीत तालुकाध्यक्ष बाळासाहेब आडागळे यांनी पत्रकार संघटनेची भूमिका, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारांवरील अन्यायाविरोधात संघटितपणे लढण्याची गरज आणि संघटनेची उद्दिष्टे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत निर्भीड, निःपक्षपाती आणि जनहिताची पत्रकारिता करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार पृथ्वीराज निर्मळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना पत्रकारितेतील नैतिक मूल्ये, सत्यतेची भूमिका आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यावर भाष्य केले. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांनी परस्पर सहकार्याची भावना जोपासून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून माजलगाव तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटना अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments