वैरागड येथे तुटलेल्या तारीच्यां विजेच्या धक्क्याने बैल ठार, तर शेतकरी जखमी……
लासुर स्टेशन येथील एम.एस.ई.बी.चा भोंगळ कारभार पुन्हा आणि अनेकदा चव्हाट्यावर….
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन जवळ असलेल्या वैरागड येथे विजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का लागून एका बैलाचा जागीच मृत्यू झाला असून शेतकरी गंभीर जखमी झाला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लासुर स्टेशन येथून जवळच असलेल्या वैरागड येथील गट नंबर ४६ मधील शेतामध्ये मारुती जनार्दन शेजवळ (वय 52)हे शेतकरी आपल्या शेतामध्ये मका लागवडीसाठी वखराच्या साहाय्याने मशागत करत असताना तुटलेल्या तारेचा वीजप्रवाह असल्यामुळे धक्का लागून बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर शेतकरी मारुती जनार्दन शेजवळ ( वय ५० ) हे गंभीर जखमी झाले असून लासूर स्टेशन येथील जगताप हॉस्पिटल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नातेवाईकांनी बैलाकडे बघून अक्षरशा हंबरडा फोडला आणि एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे परंतु महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आज एका शेतकऱ्याचा लाखो रुपये किंमतीचा बैल या ठिकाणी दगावला आहे याला जबाबदार असणाऱ्या अभियंता आणि वायरमन यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मान्सून पूर्व दुरुस्ती म्हणून कामे हाती घेतले जातात परंतु कागदपत्रे कामे झाल्याचे दाखवून फक्त बिले उचलून आपले उखळ पांढरे करण्याचे काम महावितरण आणि संबंधित एजन्सी करत आहे त्यांच्याविरुद्ध कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी करण्यात शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.