वेरूळचा ऐतिहासिक ‘सीता न्हाणी’ धबधबा ओसंडून वाहू लागला; पर्यटकांची गर्दी
खुलताबाद/प्रतिनिधी/ तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, त्यामुळे येथील ऐतिहासिक ‘सीता न्हाणी’ धबधबा पूर्ण वेगाने ओसंडून वाहू लागला आहे. पावसामुळे लेणी परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली असून, दरीत कोसळणारे धबधब्याचे पांढरेेशुभ्र पाणी निसर्गप्रेमींसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.
वेरूळ लेणीच्या मुख्य परिसरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हा धबधबा असून, येथे येणाऱ्या पर्यटकांना लेणीच्या प्राचीन इतिहासासोबतच या निसर्गरम्य आणि नयनरम्य धबधब्याचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. पावसाळी पर्यटनासाठी सध्या हा परिसर सज्ज झाला आहे.
