अंबड शहर शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न
जालना/प्रतिनिधी/ अंबड शहर शिवसेनेची आढावा बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.भाऊसाहेब घुगे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली.सदरील बैठकीत शहराचा आढावा घेण्यात येऊन विशेष सखोल पुनर्निरीक्षण (S.I.R.) अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील १०२-बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघातील BLA-2 प्रतिनिधीं यांना मार्गदर्शक करण्यात आले.तसेच मतदार यादीचे महत्त्व,प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून नोंदणी,नवमतदारांचा समावेश,तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी सांगितले की,लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी BLA-2 घराघरात जाऊन जनजागृती करत प्रभावीपणे काम करावे,असे आवाहन करण्यात आले.तसेच अंबड शहरात शिवसेना अधिक बळकट करण्यात यावी.अशी सूचना
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिली.यावेळी भागचंद्र भोजने उपजिल्हाप्रमुख शिवसेना जालना,रावसाहेब पवार,शिवाजी जऱ्हाड,संभाजी गुढे,बबलू घुगे,लक्ष्मण गायके,भाऊसाहेब जाधव,शंकर ढेरे,राजेंद्र शेवाळे,संजय पडूळ,काशिनाथ शेवाळे,अजय शेवाळे,अक्षय शिंगाडे,साईराज शेवाळे,दिपक शिराळे,महेश रायकर,शिव गुढे,रोहित गुढे,वैभव कामठे,दत्ता शिराळे,करण शेवाळे,सदाशिव गुढे,दत्तू पाचूदे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.