Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादवीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकांसह विविध पर्यायांचा वापर करा महावितरणचे वीजग्राहकांना आवाहन

वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकांसह विविध पर्यायांचा वापर करा महावितरणचे वीजग्राहकांना आवाहन

वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकांसह विविध पर्यायांचा वापर करा
महावितरणचे वीजग्राहकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : वीजपुरवठा खंडित झाल्यास स्थानिक वीज कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करण्याऐवजी महावितरणच्या 24×7 कार्यरत टोल फ्री क्रमांकांवर तक्रार नोंदवावी. त्यामुळे तक्रारीची अधिकृत नोंद होऊन तिचे जलद आणि प्रभावी निवारण होण्यास मदत होते, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणकडून वीजपुरवठा, वीजबिल, तांत्रिक बिघाड तसेच विद्युत सुरक्षेसंदर्भातील तक्रारींसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महावितरणचे टोल फ्री क्रमांक :
1912
19120
1800-233-3435
1800-212-3435

टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे फायदे

  • 24 तास सेवा उपलब्ध :दिवस-रात्र कोणत्याही वेळी तक्रार नोंदविता येते.
    • तक्रारीची अधिकृत नोंद : प्रत्येक तक्रारीला स्वतंत्र तक्रार क्रमांक दिला जातो.
    • तक्रार थेट संबंधित कार्यालयाकडे : तक्रार तत्काळ संबंधित शाखेकडे पाठविली जाते.
    • वेळेची बचत : एका कॉलमध्ये तक्रार नोंदवून पाठपुरावा करता येतो.
    • त्वरित प्रतिसाद : फ्यूज कॉल, तार तुटणे, खांब पडणे, कमी-जास्त दाब (व्होल्टेज) यासारख्या समस्यांवर तत्काळ कार्यवाही करता येते.
    • मानकांनुसार निवारण : प्रणालीमध्ये नोंद झालेल्या तक्रारींचे निश्चित कालावधीत निराकरण केले जाते.
    • सुरक्षिततेसाठी उपयुक्त : पडलेल्या वीजवाहिन्या किंवा धोकादायक विद्युत परिस्थितीची माहिती तत्काळ देता येते.

तक्रार नोंदविताना 12 अंकी ग्राहक क्रमांक जवळ ठेवा. त्यामुळे तक्रार जलद नोंदवून तिचे अचूक निवारण करणे शक्य होते.

नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत

महावितरणच्या प्रत्येक मंडल कार्यालयात दैनंदिन संनियंत्रण समितीचे नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.

  • छत्रपती संभाजीनगर शहर मंडल – 7066042412
    • छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडल – 7875756665
    • जालना मंडल – 7875764144

अतिवृष्टी, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वीजवाहिन्या तुटणे, खांब कोसळणे अथवा विद्युत दुर्घटनेची शक्यता निर्माण झाल्यास त्याची माहिती टोल फ्री क्रमांकांवर किंवा नियंत्रण कक्षास तात्काळ द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

एसएमएस व मिस कॉलद्वारेही तक्रार नोंदवा

वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून022-50897100या क्रमांकावर मिस कॉल द्या.
    • अथवा NOPOWER<ग्राहक क्रमांक> असा संदेश 9930399303 या क्रमांकावर पाठवा.
    • तक्रार नोंद झाल्यानंतर ग्राहकाला पुष्टीकरणाचा एसएमएस प्राप्त होतो.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments