विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तुत्वाने सुवर्ण पाऊलखुणा ठेवत गगन भरारी घ्यावी
डॉ पुरुषोत्तम देशमुख यांचे प्रतिपादन
घनसावंगी/प्रतिनिधी/ मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न :- घनसावंगी मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे दिनांक 6 जून रोजी सांस्कृतिक विभागाच्या वतीने बीए,बीकॉम बीएससी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आनंद देशमुख होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर चे अर्थशास्त्र विभागाचे प्रो.डॉ. पुरुषोत्तम देशमुख हे होते. सुरुवातीला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागतगीत जयश्री दाते ने गायले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रो.डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सांगितले की ” ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे.हे युग ज्ञान,विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे.विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील त्यांचे संस्कार,आपली माती ,आपला समाज यांच्या प्रति संवेदनशीलता राखत यशस्विता गाठावी.नकारात्मक विचार, निराशा त्यागून सकारात्मक विचार मनात ठेवून वाटचाल करावी.पदवीनंतर विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.प्रचंड मेहनत,अभ्यासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वीतेच्या पाऊलखुणा सोडाव्यात” असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यावेळी अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ आनंद देशमुख यांनी सांगितले की “विद्यार्थी हेच खरे अर्थाने देशाचे भविष्य आहे.विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मार्गक्रमण करावे.विविध संधी उपलब्ध आहेत.संघर्षातून यश प्राप्त करता येते.विविध उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी सुरेश दगडू गोफणे (नेव्ही) योगेश हिरामण वाघमोडे (नेव्ही) मंगेश म्हस्के (MSF) विकास घायतडक (पोलीस) या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.मंगेश मस्के,विकास घायतडक,प्रांजल जाधव,रवींद्र उगले,रेवती भानुसे,पायल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब सोनवणे केले. सूत्रसंचालन डॉ कन्नुलाल विटोरे यांनी तर आभार डॉ ऋषीबाबा शिंदे यांनी मानले आहे.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.