Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादमहावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द...

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान नवी दिल्लीतील जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषदेत मानाचा पुरस्कार

 

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा

‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

नवी दिल्लीतील जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषदेत मानाचा पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सरकारीऔद्योगिकशैक्षणिक व संशोधन संस्थांच्या समन्वयातून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्लोबल एनर्जी अॅण्ड एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्या (जीईईएफ) वतीने महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचा विद्युत क्षेत्रात मानव संसाधनातील कामगिरीसाठी ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

‘जीईईएफ’च्या वतीने शुक्रवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद-२०२६ चे आयोजन करण्यात आले. या परिषदेत स्वच्छ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विविध तज्ज्ञ सहभागी झाले होते व प्रामुख्याने विकसित भारत आणि ऊर्जा सुरक्षितता यावर विचारमंथन झाले.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी ८६ हजार कर्मचारी आणि सव्वा तीन कोटी वीजग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून विद्युत सुरक्षिततेचे उपक्रम व त्यासाठी जागतिक विक्रमी लोकसहभाग, कर्मचारी कल्याण व प्रोत्साहनपर धोरण, कर्मचारी संघटना संवाद-उपक्रम, आधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण, मानव संसाधनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महिला कर्मचारी सन्मान व सक्षमीकरण, कर्मचाऱ्यांना हरित ऊर्जेसाठी प्रोत्साहन यासारखे कर्मचारी-हितैषी अनेक उपक्रम राबविले. व्यवस्थापनाच्या मंजुरीने धोरणात्मक निर्णय अंमलात आणले.

या कामगिरीचे मूल्यमापन करून ‘जीईईएफ’च्या निवड समितीकडून जागतिक परिषदेत पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात विद्युत क्षेत्रातील मनुष्यबळ विकासाच्या योगदानासाठी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचा ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६‘ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतातील रशियन फेडरेशनचे उपायुक्त डॉ. एव्हगेनी ग्रिव्हाआइसलँडचे राजदूत श्री. बेनेडिक्ट होस्कुल्डसन आणि नीती आयोगाचे माजी सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्या हस्ते श्री. पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments