Sunday, June 21, 2026
Homeऔरंगाबादकुंभारझरी शिवारात बिबट्याचं सावट

कुंभारझरी शिवारात बिबट्याचं सावट

कुंभारझरी शिवारात बिबट्याचं सावट
टेंभुर्णी/प्रतिनिधी/ जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी शिवारात खूप मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व रात्री उसाची पाणी करण्यासाठी शेतात जावे लागते,अशात सर्वत्र उसाचे क्षेत्र असल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात बिबट्याचे मागं दिसले तर काही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.येथील शेतकरी शिवाजी महाराज चव्हाण हे आपल्या शेतात ऊसाला पाणी भरत असताना अचानक बिबट्या त्यांच्या समोर उभा असल्याचे प्रत्यक्ष त्यांनी सांगितले तर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सुद्धा आपल्या शेतात प्रत्यक्ष बिबट्या बघितला असून त्यांच्यावर धाव करता क्षणी त्यांनी त्या ठिकाणावरून घाबरत पळ काढला,शिवारात अनेक ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. तसेच येथील शेतकरी रामेश्वर चव्हाण संतोष माळी यांच्या सह अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या बघितला आहेत काही ठिकाणी कुत्र्याची शिकार झालेली आढळून आली आहेत, अशात वनविभागाला अनेक वेळा माहिती दिली असून वन विभागणी मात्र यावर अजून कोणतीही कार्यवाही केली नाही.. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहेत आज सर्व गाव बिबट्याच्या दहशतध्ये असून भीतीचे वातावरण तयार झाले आहेत उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस भरण्यासाठी शेतात जावेच लागते जिवावर उदार होऊन येथील शेतकरी या बिबट्याच्या दहशतीमध्ये शेती करीत आहेत,एखादी मोठ्या हानी होण्या पूर्वी वनविभागाने तत्काळ यावर उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments