Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादशिवसेना जालना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी रुपम घुगे यांची नियुक्ती

शिवसेना जालना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी रुपम घुगे यांची नियुक्ती

शिवसेना जालना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी
रुपम घुगे यांची नियुक्ती

जालना :- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या
आदेशावरुन जालना जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.
यात महिला आघाडीच्या जालना जिल्हा  संघटकपदी रुपम रमेश घुगे यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल शिवसेना नेते तथा राज्याचे
माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुपम रमेश घुगे
यांचा सत्कार केला. रुपम घुगे ह्या एक उच्च शिक्षित महिला असून शिवसेनेचे
जेष्ठ नेते भानुदास घुगे यांच्या त्या सुनबाई आहेत. त्यांच्या
नियुक्तीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments