रविंद्र लिंगायत यांना राज्यस्तरीय डायनॉमिक इंडिया अवार्ड जाहीर
जालना/प्रतिनिधी/ आंतरराष्ट्रीय नामांकन(आय.एस.ओ.९००१- २०१५) प्राप्त डिजिटल प्रेस कुब ऑफ इंडिया द्वारा आयोजित राज्यस्तरीय ‘डायनॅामिक इंडिया अवॉर्ड २०२६’ साठी मुंबईतील चारकोप येथील रविंद्र लिंगायत यांची निवड करण्यात आली.
पत्रकारिता क्षेत्रात उलेखनीय कार्यासाठी रविंद्र लिंगायत यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया पत्रकारिता क्षेत्रातील उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी ‘राज्यस्तरीय डायनॅमिक इंडिया अवॉर्ड २०२६ पुरस्काराचे’ आयोजन करण्यात येते.यामध्ये पत्रकारिता, शिक्षण,साहित्य,सामाजिक,खेळ,राजकीय,सौंदर्य, डॉक्टर,वकील,महिला,सहकार,पतसंस्था,कला, इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणा? या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते.यामध्ये मुंबईतील चारकोप येथील रविंद्र लिंगायत यांची पत्रकारिता क्षेत्रातील डायनॉमिक इंडिया अवार्ड २०२६ पुरस्कारासाठी करण्यात आली असून,रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील भातृ मंडळ हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, तेथील मान्यवरांच्या हस्ते रविंद्र लिंगायत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारामुळे रविंद्र लिंगायत यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.