Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादटाकळी येथील शिवेश्वर विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

टाकळी येथील शिवेश्वर विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

टाकळी येथील शिवेश्वर विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील शिवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी अंतुर येथे आज दि १९ फेब्रुवारी रोजी मा. प्राचार्य  संदीप पाटील माजी. जि. प. सदस्य  यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवछत्रपतींच्या पोशाखात विद्यार्थ्यांने वस्त्र परिधान करून सोबत जिजामातेच्या पोशाखात दोन विद्यार्थिनी तसेच अनेक मुलींनी नऊवारी पातळ परिधान करून भालदार ,चोपदारसह घोड्यावरून महाराजांची प्रभात फेरीद्वारे शाळेच्या प्रांगणातून संपूर्ण टाकळी गावात मिरवणूक काढण्यात आली. टाकळी अंतूर येथील  गावातील वेशीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती शाळेचे प्राचार्य संदीप पाटील  मा. जि. प. सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे उपमुख्याध्यापक  अशोक सपाटे  यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यात कुमारी पंकजा गवळी तसेच कुमारी वेदिका झोड यांनी उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल विद्यालयाचे पर्यवेक्षक भिकन  मेटे  नारायण ताटू  यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गीतातून व भाषणातून शिवरायांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री अशोक सपाटे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .शेवटी विद्यार्थ्यांना मसालेभात व गोड पदार्थांचे जेवण  देण्यात आले  व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सोळुंके सर यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments