Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादअभिनव जिगे याने जी मेन्स  परीक्षेत मिळवले ९७ पर्सेंटाईल

अभिनव जिगे याने जी मेन्स  परीक्षेत मिळवले ९७ पर्सेंटाईल

अभिनव जिगे याने जी मेन्स 
परीक्षेत मिळवले ९७ पर्सेंटाईल
जालना/प्रतिनिधी/ नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या जी मेन्स 2026 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,यामध्ये मठपिंपळगाव (ता.अंबड)येथील अभिनव संतोष जिगे याने 97 पर्सेंटाईल गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.या गुणांसह तो आयआयटी प्रवेशासाठीच्या ‘जी ॲडव्हान्स्ड’ परीक्षेसाठी पात्र ठरला आहे.
​देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत अभिनवने आपल्या जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले असून या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 97 पर्सेंटाईल गुण मिळवल्यामुळे त्याला देशातील नामवंत एनआयटी किंवा आयआयआयटी सारख्या संस्थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.
अभिनवने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे. अत्यंत शिस्तबद्ध अभ्यास आणि सातत्य यामुळेच हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले.आता ‘जी ॲडव्हान्स्ड’ परीक्षेत यश मिळवून आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे हे त्याचे पुढील ध्येय आहे.
​या यशाबद्दल अभिनवचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून,पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत..
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments