डॉ. रफीक जकेरीया उर्दू प्रायमरी स्कूल, शहीद एहसान जाफरी मेमोरियल हायस्कूल व सेंट मेरी इंग्लिश स्कूल, जुना जालना यांचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..
जुना जालना परिसरात शिक्षणाचा उत्सव; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रंगला स्नेहसंमेलन सोहळा.
जालना/प्रतिनिधी/ जालन्यात ह्युमन चाईल्ड वेलफेअर अॅण्ड एज्युकेशनल सोसायटीद्वारे संचलित डॉ. रफीक जकेरीया उर्दू प्रायमरी स्कूल, शहीद एहसान जाफरी मेमोरियल हायस्कूल व सेंट मेरी इंग्लिश स्कूल, जुना जालना यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. मस्तगड, जुना जालना येथील ‘शीतल गार्डन’ या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मा. एकबाल पाशा होते. प्रमुख अतिथी म्हणून Maulana Azad Minorities Financial Development Corporation चे अध्यक्ष शाह आलम खान, माजी नगरसेवक अकबर खान बने खान, न्यू नॅशनल एज्युकेशन सोसायटी जालना चे अध्यक्ष काझी नईमोद्दीन, संभाजीनगर काँग्रेस अल्पसंख्यांक कमिटीचे सरचिटणीस अजमल सिद्दीकी, नगरसेवक आमेर पाशा, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक शेख, गणेश चौधरी (चौधरी ब्लड डोनर ग्रुप), गुलाब खान, माजी नगरसेवक आरेफ खान, अशरफ खान,अमजद खान (सामाजिक कार्यकर्ते), फिरोज बागवान (सामाजिक कार्यकर्ते), मिर्झा आमेर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. एकबाल पाशा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रफीक यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. “जालना शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज होती आणि संस्थेने ती प्रभावीपणे पूर्ण केली आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी नगरसेवक अकबर खान यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. विशेषतः मुस्लिम समाजात शिक्षणाची चळवळ उभी राहण्यासाठी सामाजिक पातळीवर जागृती होणे आवश्यक आहे.”
शाह आलम खान यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये नैतिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालक यांचीच आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबत नैतिक मूल्येही तितकीच आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले. संस्थेच्या कार्याचा गौरव करत त्यांनी शिक्षक व व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष अब्दुल शफीक अ. रशीद, सचिव फरीदा जबीन, मोहम्मद दानिश, मु. अ. अन्सारी, नाजिया, तबस्सुम मॅडम, शबाना मॅडम, शबाना शाहीन, उज्मा खान, गुल अफरोज मोमीन, सबा अंजुम, यास्मीन शेख, अन्सारी काशेफ सर, वहीद सर, मुदस्सीर सर, एकबाल सर, शेख असलम आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत होते.
कार्यक्रमाची सुरुवात नात-ए-पाक सादरीकरणाने झाली. त्यानंतर इयत्ता ई.के.जी. ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी फिल्मी गीतांवरील नृत्य, नाटिका, विनोदी सादरीकरणे, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय क्रमांकाची पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मा सिराजुद्दीन शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन अब्दुल रफीक यांनी मानले.