Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादराजूर चौफुली जवळील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते साडेसात मीटर सिमेंट कॉंक्रिट चे...

राजूर चौफुली जवळील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते साडेसात मीटर सिमेंट कॉंक्रिट चे होणार – भास्कर आबा दानवे

राजूर चौफुली जवळील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते साडेसात मीटर सिमेंट कॉंक्रिट चे होणार – भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी/ राजूर चौफुलीजवळील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते खूपच अरुंद असून ते खूपच खराब झालेले असल्यामुळे वाहतुकीसाठी योग्य राहिले नाहीत, मोठमोठे खड्डे पडले आहेत, याठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी दोन मीटर सिमेंट नालीसह साडेसात मीटर चा सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार होणार असे भास्कर आबा दानवे यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे.

            निवेदनात पुढे असे नमूद आहे की, राजूर चौफुली जवळील उड्डाणपुला खालील दोन्ही बाजूनी जाणारे रस्ते खूपच अरुंद असून फक्त चार मीटरचे रस्ते आहे, ते ही अत्यंत खराब झालेले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ते वाहतुकीयोग्य राहिले नाहीत, तास ना तास वाहतूक ठप्प होत असल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना याचा खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे. भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी नॅशनल हायवे चे मुख्य अभियंता यांना फोन द्वारे संवाद साधून, रस्त्यावरील अडचणी सांगितल्या आणि  सदरील उड्डाणपुला खालील दोन्ही बाजुने जाणारे रस्ते पाणी वाहून जाण्यासाठी दोन मीटर च्या सिमेंट नालीसह साडेसात मीटर चे सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करून देण्यासाठी सुचना केली.

            त्यानुसार नॅशनल हायवे चे मुख्य अभियंता यांनी अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांना सदरील ठिकाणी पाहणी करून अहवाल सादर करा असे निर्देश दिले होते.

            त्यानुसार दिनांक १३/०२/२०२६ रोजी नॅशनल हायवे चे अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण व उपअभियंता श्री.कचाळे यांनी राजूर चौफुली जवळील उड्डाणपुला खाली येऊन दोन्ही बाजूनी जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. त्याठिकाणी वरच्या बाजूने मार्केट कमिटी पासून १५० ते २०० हेक्टर मधील पावसाळ्याचे पाणी त्याठिकाणी जमा होत असल्याने पावसाळ्याचे पाणी वाहून जाण्यासाठी त्याठिकाणी दोन्ही बाजूने दोन मीटर सिमेंट नालीसह साडे सात मीटर चा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणे गरजेचा असल्याबाबत त्यांनी नॅशनल हायवे चे मुख्य अभियंता यांना कळविले. त्यानुसार मा.मुख्य अभियंता यांनी तात्काळ अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी सादर करावे असे निर्देश श्री.कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांना दिले.

यावेळी त्यांच्या समवेत महानगरपालिकाचे तांत्रिक सल्लागार इंजी.विष्णू डोंगरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब पाटील दानवे यांचे स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments