Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कपिल इंगळे यांना पीएच.डी. प्रदान

सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कपिल इंगळे यांना पीएच.डी. प्रदान

सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कपिल इंगळे यांना पीएच.डी. प्रदान

देगलूर/प्रतिनिधी/ बिलोली – तालुक्यातील सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र शारदानगर सगरोळी येथील कृषी विद्या (ऍग्रोनॉमी) विषयाचे शास्त्रज्ञ कपिल शिवाजीराव इंगळे यांनी श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठ (जे.जे.टी), झुंझुनू, राजस्थान येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.इंगळे यांचे संशोधन कार्य नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या वाढी, उत्पादन व आर्थिक लाभांवर तण व्यवस्थापन पद्धतींचा परिणाम या विषयावर आधारित असून हे संशोधन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपयुक्त व लाभदायक ठरणार आहे.यामुळे संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सकारात्मक वातावरणामुळे व सहकाऱ्यांच्या प्रेरणेमुळे हे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या यशाबद्दल संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख (अण्णा) कार्यकारी संचालक श्री. रोहित देशमुख , कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डाॅ.माधुरी रेवणवार,सहकारी,अधिकारी,मित्र व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments