Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादमंडल स्तंभ स्थापना दिन निमित्त दोदडगाव येथे सत्यपाल महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन...

मंडल स्तंभ स्थापना दिन निमित्त दोदडगाव येथे सत्यपाल महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सत्यपालची सत्यवाणी मधुन होणार समाजप्रबोधन

मंडल स्तंभ स्थापना दिन निमित्त
दोदडगाव येथे सत्यपाल महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन
सत्यपालची सत्यवाणी मधुन होणार समाजप्रबोधन

वडिगोद्री :- देशातील पहिला मंडल स्तंभ ( ओबीसी स्मारक) छत्रपती संभाजीनगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग दोदडगाव ता.अंबड येथे मंडल स्तंभ स्थापना दिन निमित्त महाराष्टातील प्रसिद्ध राष्ट्रीय  समाजप्रबोधनकार , सप्त खंजेरी वादक  श्री सत्यपाल महाराज चिंचोलीकर अकोट यांचा सत्यपाल ची सत्यवाणी या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार ता.2 रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला मंडल स्तंभ निर्माते माजी आ.श्री. नारायणराव मुंडे, माजी मंत्री श्री. महादेव जानकर, मंडल स्तंभ स्मारक समीतीचे अध्यक्ष प्रा.सत्संग मुंडे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या ठिकाणी दोदडगाव व भागातील समाज कार्य करणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्ञानदेव बांगर नालेवाडी, माजी जि.प.सदस्य देविदास खटके वडिगोद्री, भास्करराव दखणे अंतरवाली सराटी, रामचंद्र खोमणे वडिगोद्री, ह.भ.प.बळीराम म.शिंदे शहापूर, बेवारस मनोरुग्णाची सेवा करणारे शहापूर येथील सारीका पवार, माधवराव पवार यांना सामाजिक न्याय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. भागातील नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे अवहान मंडल स्तंभ स्मारक समीतीचे अध्यक्ष प्रा. सत्संग मुंडे, सयोजन समीतीचे सदस्य दिलीप दखणे, सुरेश गवळी,ह.भ.प.राधाकृष्ण म.जायकर, ह.भ.प.शिवाजी म.भागवत,सरपंच बंडु मुंढे,प्रा.लहुराव दरगुडे,प्रा.अविनाश पवार व सर्व सदस्य यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments