Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबाददिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली ‘वेळेचं महत्त्व जाणणारा...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली ‘वेळेचं महत्त्व जाणणारा नेता’… जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितली दिवंगत नेत्याची थोरवी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली

‘वेळेचं महत्त्व जाणणारा नेता’…

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितली दिवंगत नेत्याची थोरवी

 

छत्रपती संभाजीनगर :- उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रशासनाची जाण असणारे नेते होते. वक्तशीरपणा हा त्यांच्या ठायी होता. वेळेचं महत्त्व जाणणारा एक मोठा नेता आपल्यातून निघून गेला, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी स्वामी यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बोलतांना जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, प्रशासनाची जाण असणारा एक मोठा नेता म्हणून अजितदादा सगळ्यांच्या स्मरणात राहतील. समाजातील सर्व थरातील लोकांशी त्यांचा थेट संपर्क होता. प्रश्नांची जाण असणे, ते सोडविण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी असणे हे त्यांचे महत्त्वाचे गुण होते. वक्तशीरपणा हा त्यांच्या ठायी होता. वेळेचं महत्त्व जाणणारा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिवंगत नेत्याची थोरवी सांगितली.

निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी यावेळी मोठ्या संख़्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments