Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादकोण दिवस येईल कैसा,नाही देहाचा भरवसा!

कोण दिवस येईल कैसा,नाही देहाचा भरवसा!

कोण दिवस येईल कैसा,नाही देहाचा भरवसा!

धन दौलत,संपत्ती,पद,प्रतिष्ठा इत्यादी भौतिक गोष्टींचा अहंकार,गर्व,घमेंड इत्यादी मात्र टाळा!
तणावमुक्त जीवनपद्धती जगण्यासाठी अहंकाराला बाजूला करा,इतरांना तुच्छ भावनेने लेखू नका.आपल्यातील संकुचित वृत्तीचा त्याग करा आणि इतरांबद्दल कपटी भाव ठेऊ नका!!.

आपलं मन विशाल अथांग महाकाय सागरा सारखे प्रांजळ ठेवा.आदराची भावना ठेवा.कपटी विचारसरणीला मात्र बाजूला करा आणि वाईट विचारांना,वाईट प्रवृत्तीला बाजूला करा!! अशा प्रवृत्तीलाच आपल्या पासून लांब करा!! जीवनाचा मनमुरादपणे,मनसोक्त आनंद घ्या!!
आपल्याच आजूबाजूला वावरणाऱ्या संकुचित विचारांच्याच,संकुचित प्रवृत्तीच्याच, संकुचित मानसिकता डोक्यात,अंगात ठासून ठासून भरलेल्याच असलेल्या, धोकेबाजी, दगाबाजी करणाऱ्याच प्रवृत्ती आपल्याच आजूबाजूला असतीलच तर अशांना मात्र वेळीच बाजूलाच कराच.निदान भविष्यात तरी मानसिक त्रास मनस्ताप होणार नाही.तणावमुक्त जीवन जगा!
आनंदानेच हसतखेळत जीवनाचा आनंद घ्या!!
-प्रमोद सूर्यवंशी
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments