Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादनहार उद्योगसमूहाची गगनभरारी

नहार उद्योगसमूहाची गगनभरारी

नहार उद्योगसमूहाची गगनभरारी
 
छत्रपती संभाजीनगर :- येथील प्रसिद्ध नहार उद्योगसमूहाने इटलीतील विख्यात सागा ग्रुपसोबत भागीदारी केल्याने त्यांच्यावर उद्योगविश्वात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सीएमआयएतर्फे अध्यक्ष उत्सव माछर यांनी नहार समूहाचे सुभाष नहार आणि हर्षल नहार यांचे अभिनंदन करताना हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश असल्याचे अधोरेखित केले आहे.
साग नहार्स आटोटेक इंडिया प्रा.लि. असे या संयुक्त उद्योगाचे नाव असेल. आशिया आणि युरोप खंडातील ग्राहकांना अधिक समर्थपणे उच्च दर्जाची, आकर्षक व विकसित केलेली उत्पादने पुरविणे, हा या उद्योगसमूहांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे. यातून नहार समूहाच्या एका नव्या पर्वास प्रारंभ झाला आहे.
आधीच्या उत्पादनांसोबतच इव्ही आणि आयसीई पीव्हीसाठी हायड्रोलिक ट्युब, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड्स व रबर होजेसची निर्मितीही हा उद्योगसमूह करणार आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments