उपाध्याय विरजन सागर महाराज यांचे यांचे नमोकार तीर्थाकडे विहार
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ देशमुख नगर येथील ऐतिहासिक चातुर्मास व सात दिवस योग साधना शिवीराची सांगता झाल्यानंतर उपाध्याय वीरजनसागर महाराज यांचे देशमुख नगर छावणी मार्गाने छत्रपती नाशिक हायवेवरील मनोज फुलचंद दगडा याचा फार्महाऊसवर उपाध्याय सघाचे यांचे आगमन झाले सर्वप्रथम भगवंतांच्या पंचामृत अभिषेक करण्यात आला तर नंतर शांती मंत्राचे वाचन उपाध्याय विरजन सागर महाराज यांनी केले तसेच यांची यावेळी आहारचर्यी संपन्न झाली व विशेष प्रवचन संपन्न झाले यावेळेस फुलचंद मनोज रेखा रितू उमंग तरंग दगडा परिवारा उपाध्याय विरजनसागर महाराज याचे पादपुजा केले यावेळी गुरुदेव यानी सागितलं की ,धर्म प्रभावना बरोबरच आत्मकल्याण मोक्ष कल्याण हेच ध्येय असल्याचे सांगितले. संघ,स्वाध्याय, साधना आणि समाधी हाच आपला मूलधर्म आहे असे उपस्थितीना प्रवचन देताना बोलले. यावेळेस महिलांनी डोक्यावर कलश घेऊन जयघोश करत भव्य मिरवणुकीने स्वागत केले. तसेच यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला नमोकार तीर्थ येथे आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवात उपस्थित राहण्यासाठी उपाध्याय विरजन सागर महाराजांचे विहार झाले आहे यावेळी सावन चुडीवाल सोनु दगडा नरेंद्र अजमेरा सपना चूडीवाल आशा चूडीवाल निकीता चुडीवाल अमीत गगवाल निरज बडजाते जयेश बडजाते चंद्रप्रकाश मत्री नंदु अनर्थ जितेंद्र गगवाल सोमनाथ सोमासे नदु पाटील आदीं उपस्थित होते अशी माहिती नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यानी दिली
