Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादअग्रसेन विद्या मंदिर शाळेत ’क्रीडा महोत्सवाचे’ जल्लोषात उद्घाटन

अग्रसेन विद्या मंदिर शाळेत ’क्रीडा महोत्सवाचे’ जल्लोषात उद्घाटन

अग्रसेन विद्या मंदिर शाळेत ’क्रीडा महोत्सवाचे’ जल्लोषात उद्घाटन
इटखेडा/प्रतिनिधी/  पैठण रोड येथील अग्रसेन विद्या मंदिर शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५-२६ उद्घाटन दि.८/१/२०२६ रोजी आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून जी.श्रीकांतजी (महानगरपालिका आयुक्त, छ. संभाजीनगर) हे लाभले होते. त्यांच्या हस्ते छत्रपती अग्रसेन महाराज, श्रीगणेश व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने क्रीडा महोत्सवास सुरूवात झाली. शालेय विद्यार्थीनी अवनी शिराडोणकर हिने प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. शालेय अध्यक्ष सच्चानंदजी अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन अतिथींचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी व व्यासपीठावरील सन्माननीय सदस्यांच्या हस्ते शालेय ध्वज फडकवून क्रीडा ज्योत प्रज्वलीत केली गेली.
एनसीसी ऑफीसर सौरभ जोशी व दीपा देहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिली. वर्ष २०२५-२६ ची क्रीडा प्रतिनिधी आस्था त्रिपाठी हिने खेळाडूंना खेळ प्रतिज्ञा सांगितली. इ. १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांनी शारिरीक कवायतींचे सादरीकरण केले. इ. १ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक नेहा नेरळकर, सागर नागापूरकर, आस्था दिक्षीत व सुप्रिया खरात यांच्या मार्गदर्शनाखाली समूह गीत सादर करून वातावरण जोशपूर्ण बनवले. नृत्य शिक्षक दिव्या गुप्ता व प्राची वंधारे यांच्या मार्गदर्शनाखालील नृत्याने वातावरणातील जल्लोष वाढवला. यावेळी इ. १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांमध्ये धावण्याची स्पर्धा आयोजित केली गेली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शाळा समितीच्या सचिव निधीजी अग्रवाल यांनी खेळाप्रती निकोप दृष्टीकोन बाळगून स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुलांना प्रेरित केले. उद्घाटक जी.श्रीकांतजी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आजच्या युगात मानसिक आरोग्यासाठी क्रीडा कशा महत्त्वाच्या आहेत हे उदाहरणासह सांगितले. प्रसंगी व्यासपीठावर शाळा समितीचे विद्यमान अध्यक्ष सच्चानंदजी अग्रवाल, उपाध्यक्ष गोकुळजी अग्रवाल, सचिव निधिजी अग्रवाल, कोषाध्यक्ष पंकजजी अग्रवाल व शाळा समितीचे इतर सदस्य यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य संतोष कुमार करवा व उपप्राचार्या मयुरी लोगलवार, अधीक्षक अजय सोनुने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कार्यक्रमाचे प्रमुख विक्रम शर्मा, क्रीडा शिक्षक कैलास शिवणकर, रविंद्र माळी, सोनी खरात, अभिजीत शिंदे व करिश्मा मोटे यांनी महोत्सवाचे काटेकोर आयोजन केले. शालेय परिसर आकर्षक करण्यासाठी कला शिक्षक मिनल शिरूडे, प्रीती केळगावकर व शशीकांत देसले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी संपन्नेतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनन्या डोणगावकर, सई भदे व अवनी जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सई कल्याणकर हिने केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments