सुशीलाताई दानवे यांना मतदारांचा वाढता पाठींबा
जालना/प्रतिनिधी/ जालना शहरात प्रथमच होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी च्या प्रभाग क्र.१ मधील (जागा-क) अधिकृत उमेदवार सौ.सुशीला भास्कर दानवे यांना प्रभागातील महिला व नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून कमळ चिन्हाचा प्रभाव वाढत आहे.
सौ.सुशीला भास्कर दानवे या प्रचाराच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत, स्वच्छ, सुंदर व महिलांसाठी सुरक्षित प्रभाग करण्यासाठी सौ.सुशीला भास्कर दानवे यांच्यासह प्रभागातील उमेदवार कल्याण भदनेकर, ज्योती सले, पदमा मानधनी, भास्कर आबा दानवे या पाचही उमेदवारांना प्रभागात वाढता प्रतिसाद मिळत आहे.
त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी नागरिकांनी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सुरक्षा व महत्वाच्या विषयावर ठोस उपाययोजना राबविण्यात येईल असे स्पष्ट करत त्यांनी महिलांच्या साक्षामिकारानासाठी विशेष योजना युवकासाठी रोजगारभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प उमेदवार सौ. सुशीला भास्कर दानवे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी हिंद नगर, दत्त नगर, सिंधी कॉलनी, गायत्री नगर, मनिष नगर, श्रीकृष्ण नगर म्हाडा, वैभव कॉलनी, वसुंधरा नगर, जिजामाता कॉलनी, ढवळेश्वर, शिक्षक कॉलनी, सकलेचा नगर, संभाजीनगर या परिसरात प्रत्येक घरापर्यंत जाऊन मतदाराच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत, त्यांच्या या भूमिकेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र प्रचार फेरीत दरम्यान दिसून येत आहे. या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
