Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी जालना दौरा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी जालना दौरा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी जालना दौरा

जालना/प्रतिनिधी/  जालना शहरात प्रथमच होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रशेखरजी बावनकुळे हे शनिवार (दि.१०) रोजी भारतीय जनता पार्टी च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.७ मध्ये सकाळी १०.३० वा वीर सावरकर चौक, सिंधी बाजार, जालना येथे जाहीर सभा घेणार आहे, त्याचबरोबर प्रभाग क्र.१४ मध्ये छ.संभाजीनगर महाराज पुतळा जवळ, मोतीबाग समोर, जालना येथे सकाळी 11.30 वा जाहीर सभा घेणार आहेत. तसेच जालना शहरातील उद्योजक व व्यापाऱ्यासोबत दुपारी १२.३० वा रुख्मिणी गार्डन येथे बैठक घेणार आहेत.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे, महानगर निवडणूक प्रमुख व माजी आमदार कैलास गोरंट्याल, विलास बापू खरात, भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर, सतीश घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे सह आदि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

तरी या प्रचार सभेस व बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

-बाबासाहेब पाटील कोलते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments