Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादशब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि नागेबाबा मल्टीस्टेट को...

शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि नागेबाबा मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने दर्पणदिन साजरा

शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि नागेबाबा मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने दर्पणदिन साजरा

दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे विविध ठिकाणी दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला दरम्यान बदलत्या काळासोबत ज्याला बदलणे जमले त्यालाच यश प्राप्त करणे सोपे असते. याचा व्यक्तीप्रमाणे माध्यम क्षेत्राचा विस्तार आणि आजची स्थिती याचं एक चिंतन आणि येणाऱ्या काळातील बदलाचा वेध आणि याचं निमित्त अर्थात दर्पण दिन.सिंधुदूर्ग जिल्ह्यात जन्म झालेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा कार्यालेख खरोखरच अफाट आहे. मराठी माणसांनी जन्म दिलेल्या दोन व्यवसायांनी नंतर उत्तुंग अशी भरारी घेतली. यात दर्पणकार जांभेकर यांनी मुहूर्तमेढ केल्यानंतर वृत्तपत्र व्यवसाय एक आहे. सोबत स्मरण करावे असा व्यवसाय म्हणजे दादासाहेब फाळके यांनी सुरू केलेला चित्रपट व्यवसाय याचीही आठवण आपण ठेवली पाहिजे. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतले पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले त्यास दर्पण दिन असे संबोधले जातेत्या निमित्ताने लासूर स्टेशन येथील शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान व काँग्रेस पार्टी नागेबाबा मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रिडिट सोसायटी तसेच आ, प्रशांत बंब मित्र मंडळाच्या वतीने  पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.  या प्रसंगी पत्रकार सपना गायकवाड यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून फॉर्म दाखल केला त्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक जैस्वाल आणि गुलाब वाघ यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन प्रशांत दाभाडे यांनी केले, आभार प्रा शशिकांत सांगवीकर यांनी मानले. या प्रसंगी पत्रकार अशोक जैस्वाल , अविनाश संगेकर, श्रीराम मढीकर, गुलाब वाघ,फिरोज मन्सूरी, सलीम सय्यद,रामेश्वर केरे, बापू सोमासे, विजय क्षीरसागर, आप्पासाहेब  वंजारे यांचा प्रतिष्ठान चे वतीने व विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रतिष्ठान सदस्य डॉ विकास संगेकर, भास्कर बनसोडे,प्रा अशोक म्हस्के, अविनाश गायकवाड,वाल्मीक बळी, गोविंद हिवाळे, डॉ किशोर जगताप, तर काँग्रेस पार्टी लासुर स्टेशन यांच्यावतीने किशोर पवार मोहन खंडागळे मच्छिंद्र पानकर   रिचर्ड बत्तीशे नागसेन बागुल कडु शेलार यांनी परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments