Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रास तज्ज्ञ प्राध्यापकांची आवश्यकता

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रास तज्ज्ञ प्राध्यापकांची आवश्यकता

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रास तज्ज्ञ प्राध्यापकांची आवश्यकता

छत्रपती संभाजीनगर :–  सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे विविध विषयांवरील तज्ज्ञ प्राध्यापकांची प्रति तासिका तत्त्वावर आवश्यकता असल्याचे प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कळविले आहे.

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात सीडीएस ६६- दि.१९ जानेवारी ते दि.३ एप्रिल, सीडीएस-६७- दि.१५ जून ते दि.२८ ऑगस्ट या कालावधीतील प्रशिक्षणासाठी  इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान-१- सामान्य ज्ञान, इतिहास, भुगोल, भारतीय राजकारण, सामान्य विज्ञान २- अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र  या विषयांसाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाशी निवडीत  पदवीधर, पदव्युत्तर तज्ज्ञ प्राध्यापक, किमान दोन वर्ष स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम शिकवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराने आपल्या कागदपत्रांसह दि.९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. मुलाखतीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे उपस्थित रहावे असे आवाहन  ले. कर्मल विलास शंकर सोनवणे (नि.)  प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  भ्रमणध्वनी ९१५६०७३३०६ व ०२५३-२४५१०३२ वर संपर्क करावे असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments