अ.भा.ग्रामीण पत्रकार संघातर्फे शनिवारी पत्रकार दिनाचे आयोजन- विकासकुमार बागडी
जालना :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संघटक श्री. विकासकुमार बागडी यांनी शनिवार,दि.10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता येथील हॉटेल मधुबन हॉल, शिवाजी पुतळा, जालना. येथे आयोजन केले आहे.
या सोहळ्यासाठी उद्योजक घनशामसेठ गोयल, सतीशसेठ अग्रवाल, राजेंद्रसेठ भारुका, कैलाससेठ लोया, शिवरतनजी मुंदडा, तसेच सामाजिक कार्यकर्ते तुलजेसभैय्या चौधरी, डॉ. ओम अग्रवाल, जेपीसी बॅकेचे संचालक विरेंद्र धोका, मर्चंट बॅकेचे माजी उपाध्यक्ष रविंद्र फुलभाटी आदींची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार बाबुरावजी व्यवहारे, ज्येष्ठ पत्रकार विनायक दहातोंडे, विलास खानापूरे, अंकुशराव देशमुख, लक्ष्मण राऊत, दिलीप राठी, रविंद्र बांगड, संजय भरतीया, अर्पण गोयल, सुरज बियाणी, भारत धपाटे, बद्रीनाथ टेकाळे, धर्मद्र जांगडे, अमित आनंद, अनुप राठी, सुहास कुलकर्णी, संदीप बदनापूकर, अहेमद नूर, अविनाश कव्हळे, महेश जोशी, उमेश वाघमारे, संजय देशमुख, विजय सकलेचा, संजय कोठावळे, बाबासाहेब कोलते, संतोष दायमा, पारस नंद, लियाकतअली खान, श्रीकिशन झंवर, प्रताप गायकवाड, तसेच ज्येष्ठ डीटीपी ऑपरेटर मधुकर मुळे, ज्येष्ठ मशनरी चालक सय्यद शफी, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता गुंजन शहा आदींची उपस्थिती राहणार आहे. यावेळी दिवंगत पत्रकार शशिकांत पटवारी, सतीष बियाणी, सुरेंद्र जैस्वाल, उदय पटवारी, शेख अलिम, मनोहर बुजाडे, लक्ष्मण पायगव्हाणे, अबुल हसन, रमण गायकवाड, दिगंबर शिंदे, गणेश जळगांवकर, लक्ष्मीनारायण पिपरिये, संतोष डब्बरवाल, श्रीकृष्ण भारुका, राजकुमार जैस्वाल, राजेंद्र तिरुखे, रतनलाल कुरिल, सतीश सुदामे, अनिल खंदारे, चंद्रकांत शहाणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.
यावेळी आमंत्रीत मान्यवर अतिथी आणि पत्रकारांनी वेळेवर उपस्थित रहावे,असे आवाहण आयोजक विकासकुमार बागडी आणि आमंत्रण समितीचे सुयोग खर्डेकर, विकास काळे, देवचंद सावरे, बद्री उपरे, मुकेश परमार, आकाश माने, राजेश गौड, गोपाल गोमंतीवाले, युवराज कुरिल, गौतम वाघमारे, सचिन सर्वे, विजय वैष्णव, नटवर किल्लेदार यांनी केले आहे.
