” 69 वी राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धांचे आयोजन “
महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, भारतीय खेळ महासंघ अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 69वी राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टींग (19 वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धां 2025-26 चे आयोजन दिनांक 5 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहेत.
या स्पर्धेसाठी 19 वर्षे वयोगटातील संपूर्ण भारतातील 26 राज्य व युनिट मधील उत्कृष्ठ खेळाडू 332 व क्रीडा मार्गदर्शक आणि संघव्यवस्थापक 98 असे एकुण 430 सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी वेटलिफ्टींग खेळाचा स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 31 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये घेण्यात आला.महाराष्ट्र संघाच्या 19 वर्षे मुलीचे क्रीडा मार्गदर्शक म्हणून श्रीमती उज्वला माने,मुलेसाठी श्री. संकेत सरगर व संघव्यवस्थापक म्हणून श्री. रामकिशन मायंदे, क्रीडा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र संघ 19 वर्षे मुले : विनायक अमोल काटकर, गौरव रविंद्र माळी, सार्थक रविंद्र मेमणे, साहिल् यादवराव जाधव, सम्यक विनोद कांबळे, इरफान यासिन बारगिर, मानव निलेश पाटील, कृष्णाकांत सुमित सुरवसे
महाराष्ट्र संघ 19 वर्षे मुली : अपूर्वा मारोती गाडे, श्रावणी विजय पुरदरे, समिक्षा अमोल मंदे, राऊत ईशाना सचिन, पुनम गणेश काकडे, प्रतिक्षा सुहास चिंचवडे, अस्मिता काशिलिंग काळे पाटील, माधुरी दिपक हाक्के
उदया दिनांक 6/1/2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता 69 वी राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धा 2025-26 या स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित होणार असून या स्पर्धेसाठी भारतातून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, सी.बी.एस.ई, स्पोर्टस,चंदीगड, छत्तीसगढ, दिल्ली गुजरात, हरीयाणा, आय.बी.एस.एस.जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, केरला, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल,हिमाचल प्रदेश,पुदूचेरी,राजस्थान,उत्तर प्रदेश, विद्याभारती असे एकुण 26 राज्य सहभागी झालेले आहेत.
-बाजीराव देसाई
