Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादपारनेर येथे क्रांतीज्योती यांची १९५ वी जयंती उत्साहात संपन्न

पारनेर येथे क्रांतीज्योती यांची १९५ वी जयंती उत्साहात संपन्न

पारनेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात ‘ज्ञानज्योती’ला अभिवादन; विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे

जालना/प्रतिनिधी/ शिक्षणक्षेत्रात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती पारनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाच्या जननीला अभिवादन करण्यासाठी आयोजित या सोहळ्यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

प्रतिमा पूजन व अभिवादन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभिमन्यू गाढवे सर होते. त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘सावित्रीबाई फुले यांचा विजय असो’ अशा घोषणांनी शालेय परिसर दुमदुमून गेला होता.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

यावेळी इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षावर आणि कार्यावर अतिशय अभ्यासपूर्ण विचार मांडले. सावित्रीबाईंनी शेण-दगड सोसून स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे कशी उघडली, याचा जिवंत इतिहास विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून उभा केला. तसेच उपस्थित शिक्षकांनीही सावित्रीबाईंच्या आधुनिक विचारांची आजच्या काळात असलेली गरज विषद केली.

अध्यक्षीय मार्गदर्शन

मुख्याध्यापक गाढवे यांनी आपल्या भाषणात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “सावित्रीबाईंनी केवळ अक्षर ओळख दिली नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, बालविवाह, सतीप्रथा आणि हुंडाबंदी यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. त्यांचे आयुष्य हाच आपल्यासाठी सर्वात मोठा आदर्श आहे.”

उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमास शिक्षक राजेश भापकर, विश्वनाथ पोटफोडे, दत्ता शेरे, बंडू मामा यांच्यासह विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा राजपूत हिने केले, तर शिवानी जाधव हिने उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments