Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादफुलंब्री तालुक्यातील विविध गावात बिबट्यांची दहशत, शेतकरी भयभीत

फुलंब्री तालुक्यातील विविध गावात बिबट्यांची दहशत, शेतकरी भयभीत

फुलंब्री तालुक्यातील विविध गावात बिबट्यांची दहशत, शेतकरी भयभीत
रब्बी हंगामातील पिकांना पाणी कसे द्यावे
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री तालुक्यातील विविध गावात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. फुलंब्री तालुक्यातील वानेगाव, शिरोडी, शेलगाव, किनगाव, आळंद , पिरबावडा , लहान्याची वाडी, बाजार सावंगी परिसर, ममुराबाद, जानेफळ,
धामणगाव, बिल्डा, सांजुळ आदी गावात बिबट्या दिसत आहे.
या गावात शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
सध्या सगळीकडे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री बे रात्री व दिवसा पाणी भरत आहे.
रब्बी हंगामातील गहु ,  हरभरा, आदरक व इतर पिकांना पाणी भरत आहे.यातच काही ठिकाणी दिवसा लाईट आहे तर काही ठीकाणी रात्रीची लाईट आहे.
यातच सरळ सरळ फुलंब्री तालुक्यात दिवसा लाईट उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहे.
या प्रमुख समस्या कडे फुलंब्री तालुक्याच्या आमदार अनुराधा चव्हाण, फुलंब्री च्या तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे.
या समस्या संदर्भात दैनिक आत्ताच एक्स्प्रेस चे फुलंब्री प्रतिनिधी सरफराज पटेल यांनी आमदार अनुराधा चव्हाण यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचला नाही.
तसेच फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांनी सुद्धा फोन उचला नाही.
ही प्रमुख समस्या सर्व सामान्य शेतकर्यांना सतवत आहे.
तरी पण शासन व प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments