Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादन्याय मागितल्याचा गुन्हा? ३५३ सारख्या कलमाविरोधात भोकरदनमध्ये जलभरो आंदोलनाने पेटले शेतकरी

न्याय मागितल्याचा गुन्हा? ३५३ सारख्या कलमाविरोधात भोकरदनमध्ये जलभरो आंदोलनाने पेटले शेतकरी

न्याय मागितल्याचा गुन्हा? ३५३ सारख्या कलमाविरोधात भोकरदनमध्ये जलभरो आंदोलनाने पेटले शेतकरी
जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात शेतकरी, शेतमजूर आणि लोकप्रतिनिधींवर दाखल करण्यात आलेल्या ३५३ सारख्या गंभीर गुन्ह्यांच्या निषेधार्थ आज हजारो शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्त्यांनी जलभरो आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
        पायगांव पांगरी (जि.छत्रपती संभाजीनगर) येथील सरपंच मंगेश साबळे यांनी मागील आठवड्यात भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते.पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रोहियो (मनरेगा) योजनेतील भ्रष्टाचार,गाय,गोठा अनुदान,घरकुल अनुदानातील अनियमितता,तसेच रोहियो योजनेतील लेबर मस्टर झिरो करण्याच्या प्रकारांबाबत चौकशी अशा महत्त्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
     या मागण्यांसाठी नारायण लोखंडे यांच्यासह काही नागरिकांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली.या घटनेनंतर संतप्त झालेल्या सरपंच मंगेश साबळे,शेतकरी,शेतमजूर व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात हलगीच्या तालावर दांडव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
    या आंदोलनाची गंभीर दखल घेत तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले.त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.मात्र यानंतर प्रशासनाने धक्कादायक पाऊल उचलत सरपंच मंगेश साबळे यांच्यासह सुमारे १५ शेतकरी व शेतमजुरांवर भोकरदन पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा तसेच इतर भादवी कलमासह ३५३ सारखे गुन्हा दाखल केला.
    या कारवाईच्या निषेधार्थ आज भोकरदन शहरात जलभरो आंदोलन करण्यात आले.आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
“न्याय मागितला म्हणून ३५३ चा गुन्हा?”,
“आम्हाला फाशी द्या; इंग्रजांच्या राजवटीतही असा जुलूम करण्यात आले नव्हते”,
“शेतकऱ्यांचा आवाज दडपशाहीने थांबणार नाही”
अशा आशयाचे फलक आंदोलनस्थळी लक्ष वेधून घेत होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments