Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादअंबड–जालना बिड महामार्गावर भीषण अपघात; अंबड मार्केट कमिटीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू

अंबड–जालना बिड महामार्गावर भीषण अपघात; अंबड मार्केट कमिटीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू

अंबड–जालना बिड महामार्गावर भीषण अपघात; अंबड मार्केट कमिटीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत गणेश झाडे यांचा दुर्दैवी अंत; सोनक पिंपळगावसह परिसरात हळहळ
जालना/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील अंबड–जालना बिड महामार्गावर रविवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात अंबड मार्केट कमिटीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले गणेश लक्ष्मण झाडे (रा. सोनक पिंपळगाव, ता. अंबड) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सोनक पिंपळगाव गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंबड पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या झिर्पी पाटी ते सुखापूरी फाटा दरम्यान, झिर्पी गावाजवळील महादेव मंदिरासमोर ही घटना घडली. गणेश झाडे हे रात्री कामावरून आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना, अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, झाडे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती अंबड पोलिस ठाण्याच्या डायल ११२ क्रमांकावर देण्यात आली. माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
रुग्णालयातील उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल नागरे यांनी तपासणी करून गणेश झाडे यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास अंबड पोलिस अंमलदार आमोल नरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सोनक पिंपळगाव येथे शोकाकुल वातावरणात गणेश झाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments