बिडकीन येथील डीएमआयसी प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलन छेडणार
दोन जानेवारी रोजी डीएमआयसी ऑफिसला कुलूप ठोकणार….
बिडकीन/प्रतिनिधी/ डीएमआयसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची महादेव मंदिर परिसरामध्ये बैठक संपन्न झाली डीएमआयसी प्रकल्प साठी जमीन संपादित करून बारा वर्ष पूर्ण होऊ नये आजपर्यंत डीएमआयसी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबितच आहे विशेष म्हणजे या कामामध्ये अधिकारी वर्गाची उदासीनता असल्याने प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी 2 जानेवारीपासून आंदोलन सुरू करण्याचे ठरवले आहे दोन जानेवारी रोजी डीएमआयसी प्रकल्प ऑफिस कार्यालय कार्यालयास कुलूप ठोकून , कंपन्याची कामे बंद पाडणार व डीएमआयसी प्रशासनाच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येणार आहे असल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज जाहीर केले विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांची बैठक चालू असताना आमदार विलास बापू भुमरे यांनीही या बैठकीस आपली उपस्थिती लावली व शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे खासदार संदिपान भुमरे यांनी विशेष लक्ष देऊन काही प्रश्न उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून सोडवले ही मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणाने ती प्रलंबित आहे अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे असे आमदार विलास भुमरे यांनी याप्रसंगी सांगितले व आपण प्रकल्पग्रस्तांचे पूर्ण प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रकल्पग्रस्तांसोबतच आहोत असेही त्यांनी सांगितले तसेच बिडकीन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना आंदोलनाबाबतचे निवेदन देतानाही त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी दिसले.
