Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादशिवना नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई

शिवना नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई

शिवना नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई

आत्ताच एक्सप्रेस 
गंगापूर/प्रतिनिधी/ बातमी चा दणका अवैध गोणखनीज उपसा  होत असल्याची बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात शिवना नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा मिनी हायवा जप्त केला आहे. ही कारवाई २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान करण्यात आली. प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे यांनी मौजे शंकरपूर–पिंपळवाडी रोड परिसरात छापा टाकून पिवळ्या रंगाचा मिनी हायवा (क्र. एम एच २० जी.सी.८७८५ ) ताब्यात घेतला. सदर वाहनातून अंदाजे २ ब्रास वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. वाहनचालक माऊली कोतकर याच्याकडे वाळू वाहतुकीचा वैध परवाना मागितला असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पुढील चौकशीत सदर वाहनाचे मालक संतोष उत्तमराव सिरसवार (रा. पडळसा) असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन मिनी हायवा तहसील कार्यालय, गंगापूर येथे जमा करण्यात आला आहे. कारवाईवेळी ग्राम महसूल अधिकारी गणेश लोणे उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments