धर्मतिर्थ क्षेत्राकडुन आचार्य गुणधरनंदी महाराज यांना धर्मक्राती सुर्य हि पदवी देउन सन्मानीत
धर्मतिर्थ क्षेत्रावर आचार्य गुप्तीनंदी गुरâदेव व आचार्य गुणधरनंदीजी गुरâदेव यांचा मिलन उत्साहात संपन्न
छञपतीसंभाजीनगर/प्रतिनीधी/ शहरापासुन ३० कि.मी.अंतरावरील कचनेर जवळील धर्मतिर्थ क्षेत्र येथे गणाधिपती गनधराचार्य कुंथुसागरजी महाराज यांच्या उपवनातील सुगंधीत पुष्प राष्ट्रसंत क्रातीकारी आचार्य गुप्तीनंदी गुरâदेव व नवग्रह सुमेरूतिर्थ प्रणेता राष्ट्रसंत आचार्य गुणधरनंदीजी गुरâदेव यांच्या भव्य गुरुभाई मिलन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी धर्मतिर्थ क्षेत्राच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत गुरुजी हमारे आये है नई रोशनी लाये है, जैन मुनि देख लो त्याग करना सिख लो अशा घोषणा दिल्या. धर्मतिर्थ क्षेत्रावर भव्य असा स्टेज उभारण्यात आला होता. या स्टेजवर आचार्य गुणधरनंदी महाराज व आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांची गळाभेट झाली. हा क्षण पाहतांना भाविकांनी डोळे पाणावले होते.
यावेळी उपस्थित हजारो भाविकांना जयमाला, महावीर, सौ.सारीका, पारस, सोनल, प्रशांत, लिना, प्रविण, नेहारिका, कुणाल, बडजाते परिवार नांदरवाला, अहिल्यानगर, सौ.प्रिया, नितीन, ठोलिया परिवार जयपुर यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. यावेळी सभेचे मंगलाचरण आर्यिका आस्थाश्री माताजी यांनी केले. तर भगवंताच्या फोटोसमोर विजय पाटणी, धर्मतिर्थ क्षेत्राचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटणी, अध्यक्ष चंद्र्रशेखर पाटणी वरीष्ठ उपाध्यक्ष संजय पापडीवाल, उपाध्यक्ष राजेद्र पाटणी, महामंत्री पवन पापडीवाल, सहमंत्री सतिश लोहाडे, कोषाध्यक्ष गुलाबचंद कासलीवाल मार्गदर्शक सुनिल काला, पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अजमेरा, विलास पहाडे, डॉ.राजेंद्र काला,नवीन कासलीवाल प्रमोद साहुजी प्रकाशचंद कासलीवाल, रमण साहुजी, विजय पापडीवाल, डॉ. प्रकाश पापडीवाल,धीरज पाटनी आदी मान्यवरांकडुन भगवंतासमोर पुष्प अर्पण करण्यात आले व वेरâळ, जटवाडा, कचेनर, पैठण व राजाबजार क्षेत्राच्या पदाधिका-यांनी आगमनासाठी श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी आचार्यश्रींचे पादपक्षालन संजयकुमार विजयकुमार पापडीवाल परिवारातर्फे करण्यात आले तर आचार्य गुणधर नंदीजी महाराज यांना पिच्छी देण्याचे सौभाग्य विजयकुमार जितेंद्र नितीन नविन पाटणी परिवार यांना मिळाला तर कमंडलु देण्याचा मान राखी कोमल लोहाडे यांना मिळाला तर शास्त्र देण्याचा मान अशोक प्रितेश डोसी यांना मिळाला.तर माळा भेट सिमा सतिश मखे यांना मिळाला. यावेळी धर्म तिर्थ क्षेत्रा तर्फे आचार्य गुणधर नंदीजी महाराज यांना धर्म क्रातीसुर्य हि पदवी देउâन गौरव करण्यात आला. या सन्मान पत्राचे वाचन आर्यिका आस्थाश्री माताजी यांनी केले. यावेळी आचार्य श्री म्हणाले की,धर्मतिर्थ क्षेत्र हे कालांतराने एक महान तिर्थक्षेत्र बनेल असेही सांगीतले. छत्रपती सभाजीनगरचा विविध भागातून मोफत वाहन साठी -पारस पांडे देवगाव रगारीवाला परिवार याचे सहकार्य मिळाला
अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली आहे.