समाजिक कार्यकर्ते मनोज जाधव माध्यमातुन बांधकाम कामगारांना किट वाटप
फुलंब्री/प्रतिनिधी/ इमारत बांधकाम कामगार महामंडळ यांच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते मनोज मिलिंद जाधव यांच्या माध्यमातून काल दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी वानेगाव येथील इमारत बांधकाम कामगार यांना सेफ्टी किट व Essential किट वाटप करण्यात आले .
कष्टाळू बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना थोडासा आधार मिळावा, त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारी मदत पोहोचावी, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला*
*बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी असे उपक्रम पुढेही सातत्याने राबवले जाणार आहेत असे पंचायत समिती वानेगाव गण येथील दिपाली मनोज जाधव यांनी सांगितले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री माजी उपसभापती सुभाष अण्णा गायकवाड तंटामुक्ती उपाध्यक्ष बालू पोपट शेळके मिलिंद आबा जाधव गणेश जाधव बंडू शेळके दादाराव गाडेकर सोमीनाथ शेजवळ राजू शेजवळ अजय कारबळ सुधीर जाधव , अक्षय जाधव , प्रवीण निकम , नारायण सोटम आदींची उपस्थिती होती.