Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादप्रभाग क्र १ मधून गंगाधर भाऊ वराडे व सौ.ज्योतीताई बाबर याचा अंबड...

प्रभाग क्र १ मधून गंगाधर भाऊ वराडे व सौ.ज्योतीताई बाबर याचा अंबड नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये दणदणीत विजय

प्रभाग क्र १ मधून गंगाधर भाऊ वराडे व सौ.ज्योतीताई बाबर याचा अंबड नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये दणदणीत विजय
जालना/प्रतिनिधी/  जालना जिल्ह्यातील अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश मिळवत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भाजपचे उमेदवार गंगाधर मच्छिंद्र वराडे याना २००७ व सौ ज्योती कृष्णा बाबर १५४० मताधिक्य घेऊन आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या विजयामुळे प्रभागात भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ जाहीर झाल्यानंतर या संपूर्ण निवडणुकीची सर्व सूत्रे बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी स्वतः हाती घेतली होती. निवडणूक रणनीती,उमेदवार निवड,प्रचाराचे नियोजन तसेच कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधत आमदार कुचे यांनी अंबड नगरपरिषद निवडणूक प्रभावीपणे हाताळली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणण्यासह अनेक नगरसेवक पदांवर विजय मिळवला.त्यामुळे अंबड नगरपरिषदवर भारतीय जनता पार्टीची स्पष्ट व एकहाती सत्ता स्थापन झाली असून नगरपरिषदेवर भगवा फडकवण्यात भाजपला यश आले आहे.
प्रभाग १ मधील विजयी उमेदवार गंगाधर मच्छिंद्र वराडे व सौ ज्योती कृष्णा बाबर यांनी मतदारांचे आभार मानत,“हा विजय जनतेच्या विश्वासाचा असून अंबड शहराच्या विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू,”असा निर्धार व्यक्त केला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments