Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादजालना जिल्ह्यात  नाताळ उत्साहात साजरा

जालना जिल्ह्यात  नाताळ उत्साहात साजरा

जालना जिल्ह्यात  नाताळ उत्साहात साजरा

 

जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यात ख्रिसमस (नाताळ)  सण मोठ्या श्रद्धा, भक्ती व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. जुना जालना, बेथलेहेम गांव व जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना, भक्ती व आराधना कार्यक्रमांचे आयोजन नाताळानिमित्त करण्यात आले होते. नवीन  जालना येथील मिशन हॉस्पिटल परिसरातील क्राईस्ट चर्च कॅथेड्रल जुना जालना भागातील नुतन वसाहत येथील टॉम डॉप्सन मेमोरियल चर्च तसेच बेथलेहेम येथील चर्चमध्ये ख्रिसमस निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी चर्चमध्ये विशेष भक्ती व आराधना घेण्यात आली. प्रभू येशूच्या जन्मावर आधारित उपदेश देण्यात आला.  या उपदेशातून प्रेम, क्षमा, दया, नम्रता, सत्याचा मार्ग, मानवसेवा व शांततेचा संदेश देण्यात आला. प्रभू येशूचा जन्म हा संपूर्ण मानवजातीसाठी आशा, तारण व नवजीवनाचा संदेश देणारा असल्याचे सांगण्यात आले.
नविन जालना येथील क्राईस्ट चर्चमध्ये रेव्ह. भालेराव यांनी भक्ती घेतली. यावेळी धार्मिक गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तर जुना जालना नुतन वसाहात भागातील टॉम डॉप्सन मेमोरियल चर्चमध्ये रेव्ह. बि.बि.कांबळे यांनी नाताळाची भक्ती घेतली.  चर्चमध्ये टॉम डॉप्सन तरुण मंडळाने केलेली सजावट विशेष लक्षवेधी ठरली. ख्रिसमस ट्री, आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
जालना जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाचे गाव म्हणून ओळख असलेल्या बेथलेहेम गावातही नाताळ  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथे चर्चमध्ये करण्यात आलेली सजावट  व विद्युत रोषणाई अत्यंत सुंदर दिसत आहे. प्रभू येशूच्या जन्माचा देखावा (गव्हाणी) खुप मनमोहक पद्धतीने सादर करण्यात आली असून. गव्हाणी बघण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.  चर्चवरील विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण बेथलेहेम गावाचा परिसर प्रकाशाने झगमगत आहे.  या सुंदर सजावटीमुळे यंदा बेथलेहेम येथील चर्च परिसर खुप सुंदर  दिसत आहे. विशेष आकर्षण असलेल्या प्रभू येशूचा जन्मदेखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बेथलेहेम गावातील चर्चमध्ये  होत आहे. बेथलेहेम येथील नाताळ सजावटीसाठी बाळू गणपत शिंदे यांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
जालना शहरातील टॉम डॉप्सन मेमोरियल चर्च येथे सुध्दा नाताळ निमित्त ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रभू येशूच्या जन्मावर आधारित नाटिका सादर करण्यात येणार आहे. ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे कार्यक्रम दि. 30 डिसेंबरपर्यंत चालणार असून दररोज भाविकांसाठी विशेष प्रार्थना, भक्ती, आराधना व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments