धामोरी खुर्द येथे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन अपघात दोन युवक गंभीर जखमी…
सूचनाफलक न लावता सुरू असलेले रस्त्याचे काम जीवघेणे ठरत आहे…
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील धामोरी खुर्द येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात संबंधित ठेकेदाराने कोणतेही सूचना फलक, बॅरिकेड्स, रेडियम पट्ट्या किंवा रात्रीसाठी लाईट न लावता काम सुरू ठेवल्यामुळे अत्यंत गंभीर प्रकार घडला असून दोन वेगवेगळे अपघात झाले आहेत.या अपघातांमध्ये दोन युवक गंभीर जखमी झाले असून ते सध्या उपचाराधीन आहेत.
हा प्रकार कोणताही अपघाती योगायोग नसून, ठेकेदाराच्या थेट निष्काळजीपणाला बेजबाबदारपणा व कायद्याच्या उल्लंघनामुळे घडलेला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सूचना फलक व संरक्षण व्यवस्था लावणे हे कायदेशीर बंधनकारक असताना, संबंधित ठेकेदाराने या सर्व नियमांना पायदळी तुडवले आहे.यामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले असून भविष्यात आणखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.