जवखेडा बु येथील पुंडलिकराव मोरे यांचे निधन
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथील कै. पुंडलिकराव लक्ष्मण पाटील मोरे(वय- ९०) यांना दि.२४ बुधवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वृद्धपाकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. २५ गुरूवार रोजी सकाळी दहा वाजता जवखेडा बु.येथील स्थानिक स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली,सुनं, नातवंडे, असा मोठा परिवार आहे उद्योजक प्रकाश पाटील मोरे व माजी सरपंच सविता ताई मातेरे यांचे ते वडिल होत व ते.प्रगतशील शेतकरी होते.