जवखेडा खुर्द फाटा येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील जवखेडा खुर्द हनुमान नगर.येथील हनुमान मंदिर येथे दि.२५ ते १ जानेवारी रोजी अखंड हरीनाम सप्ताह व श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.धार्मिक, उत्साह, भक्तिभाव व गावातील एकत्रित पुढाकार यामुळे या आठवडाभर चालणाऱ्या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.या श्रीराम कथा सप्ताहाचा पंच क्रोशितील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जवखेडा खुर्द. येथील हरिभक्त मिञ मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.आठवडाभर चालणारा श्रीराम कथेनिमित्त दैनंदिन कार्यक्रमांतर्गत सकाळी ४ते ६:३० काकडा, कथा, दुपारी १ ते ४ विश्रांती, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ, राञी ८ ते १०ʼ३० हरीकिर्तन, जागर होईल.
या कार्यक्रमात शिवमहापुरान कथा प्रवक्ते ह.भ.प सागर महाराज काचोळे हे श्रीराम कथा वाचन करणार आहेत. गुरुवारी दि २५\१२\२०२५ ह भ प जगन महाराज बनकर शुक्रवारी दि २६\१२\२०२५ ह.भ.प सुदाम महाराज भोकरदन शनिवारी दि २७\१२\२०२५ ह भ प महादेव महाराज निपाणी रविवारी दि २८\१२\२०२५ह भ प रामेश्वर महाराज मगर नावडी सोमवारी दि २९\१२\२०२५ ह भ प संदीप महाराज पवार रेवळगाव मंगळवारी दि ३०\१२\२०२५ ह भ प आत्माराम महाराज हातनुर बुधवारी दि ३१\१२\२०२५ ह भ प जगन्नाथ महाराज तळेकर सायंकाळी ८ ते ११ किर्तन होईल दि.१\१\२०२६ रोजी गुरुवार रोजी सकाळी ११ ते १ ह.भ.प योगेश महाराज काचोळे यांचे काल्याचे किर्तन होईल या संगीतमय श्रीराम कथा सोहळा सप्ताहाचा पंच क्रोशितील भाविकांनी श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन जवखेडा.खुर्द येथील ग्रामस्थांनी केले आहे.दरवर्षी या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.