हर्षवर्धन जाधव यांचा पिशोर दिगाव खेडी येथे सर्कल मेळावा संपन्न झाला
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सर्कल मेळावे सुरू असून जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.दि १८ डिसेंबर गुरुवारी रोजी पिशोर महादेव मंदिर सभागृह येथे मेळावा संपन्न झाला मंगळवार दिनांक 23 डिसेंबर रोजी दिगाव खेडी येथे सायंकाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी रात्रीच्या दहा वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. याप्रसंगी हर्षवर्धन जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. निधी अभावी शासनाच्या विविध योजना व विकास कामे रखडले असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तसेच घरकुल लाभ धारकांचे हप्ते रखडलेले असून, विहीर गाय गोठा चे पैसे देखील प्रकटले आहे त्यामुळे जनतेमध्ये रोष व्यक्त होत आहे. तर ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगाचा निधी अनेक ग्रामपंचायतींना मिळाला नाही त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन होणे व गावाचे विविध समस्या विकास कामांना देखील प्रतिबंध लागला आहे. प्रशासनाच्या ढासाळ नियोजन यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुणांना नोकऱ्या देण्याची आश्वासने खोटे असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. शासनाच्या योजना ह्या फक्त निवडक लाभार्थ्यांनाच मिळतात खऱ्या लाभार्थी शासकीय योजना पासून वंचित राहतात. निवडणूक झाल्यापासून तालुक्यामध्ये आमदार निधी देखील अद्यापही मिळालेला नाही यासह विविध महत्त्वाच्या समस्या त्यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच राजू तुपे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निरोप समारंभ देखील त्यांनी केला. प्रसंगी आलेल्या मान्यवरांची सत्कार सन्मान करण्यात आला. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन मा. सरपंच राजू तुपे (रायभानजी जाधव विकास आघाडी) तालुकाध्यक्ष. शामराव सुसुंद्रे. कैलास सुंसूद्रे. राजू सुंसूंद्रे पंडित दुतोंडे दिगंबर सुसूंद्रे. ग्रा.प सदस्य अर्जुन इंगळे सोसायटी सदस्य. अशोक सुंसूंद्रे चेअरमन. भागवत चव्हाण. धनंजी काकडे. गणेश पवार. राहुल सुंसूंद्रे.धनंजी गवळी. राजू माचवे. भागवत कबाडे. राहुल कुंभारे ग्रा.प सदस्य. कैलास नाईक ग्रा.प सदस्य अंबादास सुंसूंद्रे.सुदाम सुंसूंद्रे.बंडू सुंसूंद्रे. संजय शिंदे, कृष्णा थोरात, शिवाजी गाडेकर, जावेद शेख, साहेबराव जाधव, समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सरकारमधील प्रत्येक गावातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
