बेपत्ता इसमाची माहिती कळविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर – बेगमपुरा परिसरातील रहिवासी असलेले सय्यद जाहेद निजामोद्दीन वय ४४वर्ष, व्यवसाय पान शॉप हे दि.१९ डिसेंबर २०२५ पासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचे पत्नी श्रीमती जकीया भ्र.जाहेद सय्यद यांनी सिटी चौक पोलीस ठाणे येथे दिली आहे. बेपत्ता इसमाची माहिती कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बेपत्ता इसमाची पूर्ण माहितीः- नाव- सय्यद जाहेद निजामोद्दीन, , व्यवसाय पान शॉप, रा. अरब खिडकी, मस्जिद, बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर मो. नं. 9822112259 वर्ण- सावळा, बांधा – मध्यम, उंची – 5 फुट 6 इंच, नाक – सरळ, डोळे – काळे, चेहरा – गोल, केस – पांढरे बारीक, दाढी- केस पांढरे वाढलेली, भाषा – मराठी, हिंदी, बोलतो, अंगात – आकाशी रंगाचा नेहरु शर्ट व पँन्ट, मिलिंद हायस्कूल येथून दहावी पर्यंत शिक्षण झालेले, उजव्या हाताचे मनगटावर जुने जळाल्याचे व्रण, शारीरिक व मानसिक स्थिती चांगली, सोबत काही एक मौल्यावान चिजवस्तू नाही, मोबाईल सोबत नाही. या वर्णनाचा इसम कुणास आढळल्यास त्याबाबत सहायक फौजदार सईदखान मेहबुब खान, पोलीस ठाणे सिटी चौक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
