अवघ्या २२ वर्षांमध्ये स्नेहल धुपे पैठण नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी विजयी
अंबड तालुक्यातील वलखेडा येथील कन्येचा दणदणीत विजय
जालना/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील वलखेडा येथील मूळ रहिवासी व सध्या पैठण येथे वास्तव्यास असलेले मुख्याध्यापक सूर्यकांत धुपे यांची कन्या कुमारी स्नेहल सूर्यकांत धुपे हिने अवघ्या २२ व्या वर्षी पैठण नगरपरिषदेच्या नगरसेवक पदावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयामुळे पैठण शहरासह वलखेडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिला अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पैठण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या कुमारी स्नेहल धुपे यांनी तरुणाई, महिलांचा विश्वास आणि विकासात्मक दृष्टिकोन यावर आधारित प्रचार केल्यामुळे दणदणीत विजय मिळवला. प्रचारादरम्यान त्यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, महिलांच्या समस्या, युवकांसाठी संधी तसेच नागरी मूलभूत सुविधांवर विशेष भर देत मतदारांशी थेट संवाद साधला. त्यांच्या साध्या, अभ्यासू व लोकाभिमुख स्वभावामुळे मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने कौल दिल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून उमेदवार मिळवून त्या मैदानात होत्या,
मतदारांच्या पसंतीत स्नेहल धुपे पुढे राहिल्या. त्यांच्या विजयामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आल्याने सध्या पैठण सह परिसरात तसेच अंबड तालुक्यात पण त्यांच्या नावाची चर्चा जोरदार चालू असताना दिसून येत आहे.