जिल्हास्तरीय सब-ज्युनिअर सॉफ्टबॉल निवड चाचणी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या वतीने सब ज्युनिअर सॉफ्टबॉल संघांची निवड चाचणी स्पर्धा दिनांक 21 डिसेंबर 2025 रविवार रोजी सायंकाळी 4 आर्य चाणक्य विद्याधाम,जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे.
खेळाडूंनी निवडचाचणी साठी येताना आधार कार्ड झेरॉक्स व आवश्यक क्रीडा निवड चाचणी साठी लागणाऱ्या आवश्यक क्रीडा साहित्यासह उपस्थित रहावे.
या स्पर्धेतून निवडलेले खेळाडू धुळे येथे दि.26 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या सब ज्युनिअर मुला- मुलींच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
या निवड चाचणी साठी मुला- मुलींची जन्मदिनांक ही 1 जानेवारी 2011 नंतरची असावी. तरी या निवडचाचणी साठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मा.डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष फुलचंद सलामपुरे,सचिव गोकुळ तांदळे यांनी केले आहे.