Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादआपल्या जीवनात सद्गुरु आल्याने काय होते-डी.जी.दळवी

आपल्या जीवनात सद्गुरु आल्याने काय होते-डी.जी.दळवी

आपल्या जीवनात सद्गुरु आल्याने काय होते-डी.जी.दळवी

 

जालना : आपल्या जीवनात सद्गुरु आल्याने काय होते तर सद्गुरु आल्याने बरेच काही होते. परंतू काही जण म्हणतात की, सद्गुरु केल्याने काय होते. आपण बर्‍याच वर्षापासून सत्संग करत असाल परंतू ही सारी परमात्म्याची देण आहे, असे संत निरंकारी मडंळाचे छत्रपती संभाजीनगर सिडको शाखेचे संयोजक परम पूज्य डि. जी. दळवी यांनी येथे बोलतांना केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, उगीच म्हटले नाही, गुरुर ब्रम्ह, गुरुर विष्णू, गुरुर देवो… महेश्वरा! सद्गुरु वचनाचे पालन करा! त्याने काय होंते, आणि याने काय होेते, ह्या भानगडीत पडू नका, असे सांगून दळवी म्हणाले की, कुणी आठवड्याची संगत करतं कुणी पंधरा दिवसाची तर कुणी महिन्याचीही संगत करतं. आपण भगवंताच्या सानिध्यात कीती काळ राहतोे, हे म्हत्वाचे आहे. आपण भुतपूर्व आमदार,खासदार, पंतप्रधान पाहिले असतील परंतू परमात्म्याला कधी तरी भूतपुर्व झालेला पाहिला आहे का? नाही ना! जे काही होत आहे ते त्याच्या मर्जीने होते आहे. हे कधीही लक्षात ठेवले पाहिजे, असे श्री. दळवी म्हणाले.
यावेळी त्यांच्या सोबत रोहिदास फुलमाळी, सुनिल वाघ, भरत मेवाडे, सुर्यवंशी यांची उपस्थिती होती, डि. जी. दळवी यांचे जालना शाखेचे संयोजक प.पू.राजकुमार पारसवाणी यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन किरण गरड यांनी केले. या कार्यक्रमासाठी शहरी व ग्रामीण भागातून भाविक भक्त मोठ्या सख्येंने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments