सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती जालन्यात उत्साहात साजरी!
जालना: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११३ वी जयंती वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसपर्क कार्यालय, मंठा बायपास रोड,अंबड चौफुली जालना येथे उत्साहात साजरी करण्यात आली. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीसह भारतीय बौद्ध महासभेचे कार्य देश-विदेशात पुढे नेण्यात भैय्यासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान होते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष प्रमेश्वर खरात आणि सम्यक विध्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने, जेके फाऊंडेशन चे संस्थापक जावेद खान, भारतीय बौद्ध महासभाचे तालुकाध्यक्ष भास्कर गाढेकर उपस्थित होते.
अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी गौतम पाडमुख,मुनव्वर शेख .आदिल शेख मदन पहाडे सुनील पाईक राव .गुलाबराव लहाने,इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन भास्कर गाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौतम पाडमुख यांनी केले.