गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील वरझडी शिवारात अवैध गोणखणी उत्खन्न जोमात अधिकारी कोमात चर्चेला उधाण मागील काही दिवसापासून वरझडी शिवारामध्ये अवैध मुरूमाची उत्खन्न जोमात सुरू आहे. या संदर्भ गावकऱ्यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली परंतु महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. महसूल विभागाचे अधिकारी व गोणखनिज उत्खन्न करणारे माफिया यांची संगतमत असल्यामुळे गायरान जमिनीमधून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खन्न केले जात असल्याचे बोलले जात आहे.
गंगापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार करून देखील कारवाई करण्यात आली नसल्याचे आरोप गावकऱ्यांनी केले आहे. अवैध मुरूमाची उत्खन्न वाहतूक करणाऱ्यांना तात्काळ लगाम घालावे मुरूम उत्खन्न तात्काळ थांबवण्यात यावी मुरूम वाहतूक माफियावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा संबंधित गावकऱ्यांनी दिला आहे .