Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादप्रा.अविनाश डोळस प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीसमोरी आव्हान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

प्रा.अविनाश डोळस प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीसमोरी आव्हान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

प्रा.अविनाश डोळस प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीसमोरी आव्हान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
छ.संभाजीनगर/  भारतीय व महाराष्ट्रस्तरावरील ख्यातनाम अभ्यासक,विचारवंत व साहित्यिक प्रा.अविनाश डोळस यांच्या जयंतीनिमित्त प्रा.अविनाश डोळस प्रतिष्ठानमार्फत दि.13/12/25 शनिवार रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेनवन छ.संभाजीनगर येथे सायंकाळी 5.30 वाजता विशेष व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले आहे. भारतात आज राष्ट्रवादाच्या नावाखाली विविध आव्हाने उभी रहात असून भारताची धर्मनिरपेक्षता , सहिष्णूता या समोर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भारतातील वाढती बेकारी व महागाई यांनी सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. या सर्व परिस्थितीवर पुणे येथील सुप्रसिद्ध अभ्यासक व विचारवंत ॲड.सर्वजित बनसोडे हे भाष्य करणार असून ते “भारतीय लोकशाहीसमोरिल सद्यस्थितीतील आव्हाने व ऊपाय ” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.संजय मून हे या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असणार आहेत. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे जॅकलिन डोळस, डाॅ.प्रज्ञा साळवे, डाॅ.मधुकर खंदारे,आयु.सिद्धार्थ आल्टे प्रा.भारत शिरसाठ, डाॅ.क्षमा खोब्रागडे,अनिल खरतडे,डाॅ.उत्तम अंभोरे,डाॅ.किशोर साळवे, अमरदिप वानखडे इत्यादिंनी केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments